कोल्हापूरी मटणाचा आस्वाद तांबड्या-पांढऱ्यासह देणारं हॉटेल गंधार

Last Updated: Saturday, August 12, 2017 - 18:39

कोल्हापूर : कोल्हापूरकरांना खाण्याविषयी विचारा, त्यातल्या त्यात तुम्हाला मटण भाकरी खायची असेल, तर हमखास गंधार हॉटलेचं नाव घेतलं जातं. आता गंधार हॉटेलचं मटण जेवढं चवदार, फुरका मारून खाण्यासारखं तेवढांच त्याचा तांबडा पांढरा रस्साही...अहाहा म्हणत पिण्यासारखा आहे.

गंधार हॉटेलमधील मटण कसं बनवलं जातं, तांबडा पांढरा कसा बनतो याविषयी अनेकांना कुतूहल आहे, गंधार हॉटेलचं मटण एकदा खाऊन पाहा असंच आहे. तेव्हा या व्हिडीओत नेमकं तुम्हाला गंधार हॉटेलचं मटण आणि तांबडा पांढरा कसा बनवला जातो हे पाहता येणार आहे.

हा व्हिडीओ दोन भागात आहे, एका व्हिडीओत तांबडा पांढरा तयार केला जात आहे, तर दुसऱ्या व्हिडीओत उकळलेलं मटण मसाल्यात तळलं जातंय...हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच कोल्हापूरच्या तांबड्या पांढऱ्यांचा आणि मटणाच्या जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीचा अंदाज आल्याशिवाय राहणार नाही.

First Published: Saturday, August 12, 2017 - 18:39
comments powered by Disqus