कोपर्डी खटला : वकील आहेर यांना ठार मारण्याची धमकी

कोपर्डी खटल्यातील तीन नंबरचा आरोपी असणाऱ्या नितीन भैलुमचे वकील प्रकाश आहेर यांना अज्ञांताकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 22, 2017, 11:33 PM IST
कोपर्डी खटला : वकील आहेर यांना ठार मारण्याची धमकी title=

अहमदनगर : कोपर्डी खटल्यातील तीन नंबरचा आरोपी असणाऱ्या नितीन भैलुमचे वकील प्रकाश आहेर यांना अज्ञांताकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. 

संगमनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

आहेर यांनी आरोपीला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा द्या अशी मागणी न्यायालयात  केली होती.  दरम्यान या नंतर बुधवारी न्यायालयात आरोपीला फाशीऐवजी  जन्मठेपेची शिक्षा द्यायला सांगा अन्यथा जीवे मारु अशी धमकी प्रकाश आहेर  यांना देण्यात आली.  या प्रकरणी आहेर यांनी संगमनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही

जितेंद्र शिंदे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्यामुळे त्याला फाशी नको, जन्मठेपेची शिक्षा द्या अशी मागणी त्याच्या वकिलांनी केलीय. तर नितीन भैलुमे हा २६ वर्षीय तरुण असून तो शिक्षण घेतोय. त्याचं कुटुंब त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळं त्याला कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी त्याच्या वकिलांनी केली आहे. 

दरम्यान, आरोपींवर सिद्ध झालेल्या गुन्ह्यांमध्ये दोषींना जन्मठेप किंवा फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे.