कोल्हापुरातील अख्ख्य गाव झालंय 'लागिरं'

झी टीव्हीवरील अल्पवधीच लोकप्रिय झालेली 'लागिरं झालं जी' ही मालिका तुम्ही पाहत असणार. पण कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका अख्ख्या गावाचीच अवस्था लागिरं झालं जी, अशी झालीय.

Updated: Jun 21, 2017, 11:56 PM IST
कोल्हापुरातील अख्ख्य गाव झालंय 'लागिरं' title=
छाया सौजन्य : झी मराठी, सोशल मीडिया

प्रताप नाईक/ कोल्हापूर : झी टीव्हीवरील अल्पवधीच लोकप्रिय झालेली 'लागिरं झालं जी' ही मालिका तुम्ही पाहत असणार. पण कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका अख्ख्या गावाचीच अवस्था लागिरं झालं जी, अशी झालीय.

एक गावं, एक शाळा,  त्या शाळेतील एक वर्ग... आणि त्या वर्गातील सगळ्या विद्यार्थांची एकच इच्छा सैन्यात जाण्याची. असं घडलेलं आपण कुठं पाहिलेलं नाही, पण हे घडलय कोल्हापूर जिल्ह्यातील गिरगांवमध्ये.  

कोल्हापूर जिल्ह्यातल्या गिरगांवमधील स्वातंत्र्यवीर फिरंगोजी शिंदे शिक्षण संस्थेचं हे श्रीमती बाळाबाई पाटील हायस्कूल. या शाळेतले तब्बल १६५ विद्यार्थी आतापर्यंत भारतीय सैन्यात दाखल झालेत. २००९-२०१०सालच्या दहावीच्या बॅचमधील तब्बल १३ मुलं एकाचवेळी देशसेवेसाठी सैन्यात भरती झाली. अशाप्रकारची ही कदाचित देशातली पहिलीच घटना असावी.

अडीच हजाराच्या घरात लोकसंख्या असलेलं हे गिरगाव. गावातलं प्रत्येक घर या ना त्या कारणानं देशसेवेशी जोडलं गेलंय. १८५७ च्या बंडात गिरगावच्या फिंरगोजी शिंदे याने इंग्रज राजवटीच्या विरोधात उठाव केला होता. त्यावेळी परिसरातील पाचशेहून अधिक तरुणांना त्यानं एकत्र केलं होते. 

स्वातंत्र्यासाठी फिरंगोजी शिंदे यांनी प्राणाची आहुती दिली होती. अगदी दुसरे महायुद्ध असो, भारत-पाक युद्ध असो नाहीतर भारत-चीनची लढाई. गावातला कुणी ना कुणी त्यात लढलाय. त्यामुळं अगदी नव्या पिढीलाही ही परंपरा टिकवून ठेवायची आहे. गिरगावाने शौर्याची अनोखी परंपरा आजवर जपली आहे. या गावातील विद्यार्थ्यांना एकच ध्येयाने झपाटले आहे.