राज ठाकरे यांच्या भूमिकेशी मी सहमत - लक्ष्मीकांत देशमुख

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचिक अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 18, 2018, 08:07 PM IST
राज ठाकरे यांच्या भूमिकेशी मी सहमत - लक्ष्मीकांत देशमुख  title=

मुंबई : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचिक अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. 

राज ठाकरेंना साहित्यातले मर्म कळत नाही अशी टीका लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलंय. आपण राज ठाकरे यांच्या भूमिकेशी सहमत आहोत असं लक्ष्मीकांत देशमुख यांनी आता स्पष्ट केलं. 

औदुंबर येथील साहित्य संमेलनात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साहित्यिक गप्प का? असा सवाल केला होता त्याबद्दल सोलापूर येथे पत्रकारांनी प्रश्न विचारला असता आपण जे उत्तर दिले त्यातून राज ठाकरे यांच्याबद्दल अनादर न दाखवता त्य़ांच्या भूमिकेशी मी सहमती दर्शविली होती असे वक्तव्य आता लक्ष्मीकांत देशुमख यांनी केलं आहे. 

राज ठाकरे हे एका राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी साहित्यिकांकडून केलेली अपेक्षा ही रास्त असल्याने आपण त्यांच्या भूमिकेशी सहमत आहोत. तथापि साहित्यिकांची प्रतिक्रिया व्यक्त करण्याची पध्दत वेगळी आहे. साहित्यिकांना घटना घडली की, तात्काळ प्रतिक्रिया देता येत नाही. साहित्यिकांची प्रतिक्रिया ही त्यांच्या साहित्यातूनच व्यक्त होत असते. साहित्यिकांचा धर्म वेगळा असतो. तथापि जेव्हा महत्वाचा प्रश्न असतो तेव्हा साहित्यिकानी विविध व्यासपीठावर स्पष्टपणे आपले मत मांडले पाहिजे आणि तशी आपण ठाम भूमिका घेत आलो आहोत.