बिबट्याच्या हल्ल्यात महिला जागीच ठार

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला जागीच ठार झाली आहे.

Updated: Nov 16, 2017, 11:53 AM IST
बिबट्याच्या हल्ल्यात महिला जागीच ठार title=

विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला जागीच ठार झाली आहे. शेतात वरखेडे गावापासून एक किलोमीटर अंतरावरील दरेगाव रस्त्यालगतच्या शेतात ही घटना घडली आहे. मयत महिलेचे घर शेतातच आहे. 

कापूस वेचताना महिलेवर हल्ला

कापूस वेचणी करीत असतांना बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. गंभीर जखमी झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. गेल्या आठ दिवसापासून सायगाव, उंबरखेडे, वरखेडे, पिलखोड परिसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत आहे. 

चाळीसगाव तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ

यापूर्वीही मेंढपाळांना याच परिसरात बिबट्या दिसला होता. यापूर्वी देखील बिबट्याच्या हल्ल्यात उंबरखेडे येथील एक महिला आणि अकरा वर्षीय मुलगा ठार झाला आहे. सायगाव येथील शेतात काम करणाऱ्या दोन महिलाही बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या होत्या. वनविभागाकडून बिबट्याला पकडण्यात अपयश येतं आहे.