Loksabha Election 2024 Live Updates : मतदान केंद्रात मोबाईल आणू नका, निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. येत्या सोमवारी 13 मे रोजी देशातील 10 राज्यांमधील 96 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 

Loksabha Election 2024 Live Updates : मतदान केंद्रात मोबाईल आणू नका, निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. येत्या सोमवारी 13 मे रोजी देशातील 10 राज्यांमधील 96 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात निवडणूक होणार आहे. यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद (संभाजीनगर), मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघाचा समावेश आहे. तर आध्रंप्रदेशमधील 25, बिहारमधील 5, छत्तीसगडमधील 5, झारखंडमधील 4, मध्य प्रदेशातील 8, महाराष्ट्रातील 11, ओडिशातील 4, तेलंगणामधील 17, उत्तर प्रदेशमधील 13, पश्चिम बंगालच्या 8 जागांचा समावेश आहे. तसेच चौथ्या टप्प्यात 10 राज्यातील 1717 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

 

12 May 2024, 19:38 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates: राज ठाकरेंचं आनंद दिघे यांना अभिवादन

राज ठाकरे टेंभी नाका येथील आनंद आश्रमात. आनंद दिघे यांना अभिवादन केले

12 May 2024, 19:07 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक मध्ये दाखल

 नाशिकच्या मनोहर गार्डन मध्ये घेणार विविध सामाजिक संस्था शिक्षण संस्था यांच्यासोबत घेणार संवाद बैठक

12 May 2024, 18:06 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मोठी कारवाई

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मोठी कारवाई. १६ मार्च ते १० मे आचारसंहिता कालावधीत २ कोटी ६५ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त

12 May 2024, 17:59 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates: भाजप 400 नाही, 40 पण पार करणार नाही: खरगे 

काँग्रेस अहवालप्रमाणे महाराष्ट्रात काँग्रेस सर्वात जास्त जागा मिळतील, भाजप 400 नव्हे तर 40 पर देखील जाणार नसल्याचा दावा काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.

12 May 2024, 16:52 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज आनंद आश्रमाला भेट देणार

12 May 2024, 15:57 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates: बदलापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्क, शहराध्यक्षाचा राजीनामा

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिमेत आज शरद पवार यांच्या सभेआधीच राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. बदलापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश वडनरे यांनी आज तडका फडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे

12 May 2024, 15:55 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates: साताराः ईव्हीएम मशिन ठेवलेल्या गोदामाच्या परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद, सिक्युरिटी सिस्टिमचा ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस

 साताऱ्यात ईव्हीएम मशिन ठेवलेल्या गोदामाच्या परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा कोलमडली असल्याचे समोर आले आहे.याबाबत राजकुमार पाटील शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा सर चिटणीस यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे तक्रार केली आहे

12 May 2024, 15:36 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : मतदान केंद्रात मोबाईल घेवून येवू नका, निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन

मावळ लोकसभा मतदारसंघात उद्या होत असलेल्या मतदानासाठी कंट्रोल रूम सज्ज करण्यात आलेला आहे. या कंट्रोल रूम मधून 50 टक्के मतदान केंद्रावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यावेळी मतदान करताना मतदारांनी व्हिडीओ काढून तो व्हायरल करु नये, यासाठी मतदान केंद्रावर मोबाईल आणता येणार नाही, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.   

12 May 2024, 14:20 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : पुण्यातील निवडणूक कामासाठी पीएमपीच्या 818 बस रवाना

पुण्यातील निवडणूक कामासाठी पीएमपीच्या 818 बस रवाना करण्यात आल्या आहेत
पुणे शहर, मावळ आणि शिरुर या तीन लोकसभा मतदार संघात निवडणूक कामासाठी या बस रवाना केल्या आहेत
पुढील दोन दिवस या बस निवडणूक सेवेसाठी देण्यात आल्या आहेत.
त्यामुळे पुणेकर प्रवाशांना बस अपुर्‍या पडणार आहेत. 
पीएमपी प्रशासनाने या दिवशी ताफ्यातील अतिरिक्त बस मार्गावर उतराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

12 May 2024, 14:19 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : नवी मुंबईत महायुतीतर्फे मिसळ पे चर्चा

नवी मुंबईत महायुतीतर्फे मिसळ पे चर्चा कार्यक्रमाचे आयोजन, महायुतीकडून मिसळ पे चर्चा चे आयोजन, सीवूड विभागात महायुतीमधील स्थानिक नेत्यांसह विविध सोसायटीमधील रहिवाशी या कार्यक्रमात सहभागी, नवी मुंबईतील 95 आजी माजी नगरसेवक महायुती सोबत असून नरेश म्हस्के यांचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी दिली.