Loksabha Election 2024 Live : धनुष्यबाण चोरलंय पण माझी मशाल पेटलीय- उद्धव ठाकरे

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि निर्णायक टप्प्याचं मतदान सोमवारी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत दाखल होणार आहेत. 

Loksabha Election 2024 Live : धनुष्यबाण चोरलंय पण माझी मशाल पेटलीय- उद्धव ठाकरे

Loksabha Election 2024 Live Updates: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि निर्णायक टप्प्याचं मतदान सोमवारी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत दाखल होणार आहेत. 

15 May 2024, 20:59 वाजता

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गुरुवारी  ठाणे आणि कल्याण येथे तोफ धडाडणार आहे. कल्याण लोकसभेचे उमेदवार वैशाली दरेकर राणे यांच्या प्रचारार्थ डोंबिवली येथील भागशाळा मैदानावर तर ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी गडकरी चौक, डॉ. मूस रोड येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला शिवसेना नेते खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह इंडिया - महाविकास आघाडी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

15 May 2024, 19:50 वाजता

पंतप्रधानांच्या सभेत जाऊन निषेध करण्याच्या तयारीत होते शिवसैनिक. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक बाळ हरदास यांच्यासह 11 जणांना बाजारपेठ पोलिसांनी घेतले ताब्यात. कल्याणमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारण्यासाठी आणि निषेध करण्यासाठी जाणार होते शिवसैनिक.

15 May 2024, 19:35 वाजता

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीबाबतच्या धोरणामुळे राज्यातील विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

15 May 2024, 17:48 वाजता

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी शासकीय यंत्रणेचा वापर, आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी लिहिले मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र

15 May 2024, 17:35 वाजता

नरेंद्र मोदी यांच्या घाटकोपरमधील रोड शोच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुरक्षिततेची चाचणी केली जात आहे. मुंबई पोलिसांचे बॉम्बशोधक पथक देखील या ठिकाणी आहे. काही वेळापूर्वीच पोलीस उपायुक्त सत्यनारायण यांनी या रोड शोच्या रोडची पाहणी केली.

15 May 2024, 16:26 वाजता

15 May 2024, 15:30 वाजता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कल्याण येथे प्रचार सभा होणार आहे. या सभेत व्यासपीठावर आपल्याला मान दिला नाही असे सांगत शिवसैनिक अरविंद मोरे नाराज झाले असून त्यांनी राजीनामा दिला, त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये नाराजीचे नाट्य पाहायला मिळत आहे. माझी जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती आहे माझ्या हाताखाली आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह इतर पदाधिकारी देखील काम करतात. यांना व्यासपीठावर जागा देण्यात आली मात्र आम्ही काम करून सुद्धा आम्हाला व्यासपीठावर जागा देण्यात आली नाही. स्वतः मुख्यमंत्री जिल्हाप्रमुख होते जिल्हाप्रमुख पदाला जर न्याय देत नसतील मग या पदाचा काय उपयोग? मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे माझा राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले.

15 May 2024, 13:37 वाजता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री शंभूराज देेसाई, उदय सामंत आणि दिपक केसरकर या 3 मंत्र्यांवर मुंबईतील लोकसभा मतदार संघाची जबाबदारी सोपावली.

15 May 2024, 12:52 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates: प्रफुल्ल पटेलांनी माफी माफी मागावी- संभाजी ब्रिगेड

जिरेटोपाच्या मुद्द्यावरून प्रफुल्ल पटेलांनी माफी मागितली नाही तर राज्यभरात आंदोलन करू असा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिला आहे.

15 May 2024, 11:18 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates: संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका

संजय राऊतांनी मोदींच्या रोड शो आणि सभांवर सडकून टीका केली आहे. पंतप्रधान मोदी जिथे जिथे सभा घेतील तिथे भाजप हरेल असा घणाघात संजय राऊतांनी केला आहे. तर मोदींवर दारोदारी फिरण्याची वेळ शिवसेनेनं आणली आहे, असा टोलाही राऊतांनी पंतप्रधान मोदींना लगावलाय.