Bhavesh Bhinde Arrest : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी भावेश भिंडेला अटक

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Bhavesh Bhinde Arrest : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी भावेश भिंडेला अटक

16 May 2024, 23:24 वाजता

आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक, मुंबई क्राइम ब्रँचची कारवाई

 

Bhavesh Bhinde Arrest : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी अखेर भावेश भिंडेला अटक झालीय... इगो जाहिरात कंपनीचा मालक असलेल्या भावेश भिंडेला मुंबई क्राइम ब्रँचनं उदयपूरमधून अटक केलीय. त्याला आता मुंबईत आणलं जातंय. घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून 16 जणांचा मृत्यू झाला होता, तर सुमारे 75 लोक जखमी झाले होते. याप्रकरणी भावेश भिंडेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

16 May 2024, 22:49 वाजता

शिंदेंच्या रॅलीसमोर ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

 

Nashik Shinde - Thackeray Group : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅली समोर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मशालीचे चिन्ह दाखवून घोषणाबाजी केलीय... नाशिकमध्ये शिंदेंच्या रॅली समोर ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आले...यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार घोषणा देण्यात आल्या. शिंदेंनीही धनुष्यबाणाची प्रत्यंचा खेचत ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिलंय.

 

16 May 2024, 20:11 वाजता

शेवटपर्यंत उमेदवारी जाहीर केली नाही, अपमान झाल्यानं लोकसभा निवडणुकीतून माघार- भुजबळ

 

Chhagan Bhujbal Upset : माझा अपमान झाल्यानं लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केलीय... झी २४ तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही नाराजी बोलून दाखवली. अमित शाहांनी सांगितलं म्हणून निवडणुकीला तयार झालो. मात्र शेवटपर्यंत उमेदवारी जाहीर केली नाही, तो अपमान होता, असं भुजबळ म्हणाले.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

16 May 2024, 18:38 वाजता

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा

 

Unseasonal Rain : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडतोय.. तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय...पुण्यात वादळी वा-यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीये....खबरदारी म्हणून नागरिकांनी झाडाखाली आणि धोकादायक ठिकाणी न थांबण्याचं आवाहनही करण्यात आलंय....छत्रपती संभाजीनगरमध्येही वादळी वा-यासह अवकाळी पावसाचं थैमान पहायला मिळतंय...अनेक ठिकाणी नागरिकांचे हाल झालेत...तर रायगडमध्ये सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावलीये...गोरेगाव, माणगाव आणि दक्षिण रायगडच्या काही भागात वादळी वा-यासह मुसळधार पाऊस झाला. तळकोकणातही वादळी वा-याचा धुमाकूळ पहायला मिळतोय..घरांवरील छप्परं उडाली तर, घरांवर झाडं कोसळून मोठं नुकसान झालंय...काही ठिकाणी वीजेचे खांब कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित झालाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

16 May 2024, 16:42 वाजता

OBC आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर 12 जुलैला सुनावणी

 

OBC Reservation : ओबीसी आरक्षणवरील सुनावणीची तारीख पुन्हा पुढे ढकलली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर 12 जुलैला सुनावणी होणारेय. सुप्रीम कोर्टाच्या वेळापत्रकातून ही संभाव्य तारीख जाहीर करण्यात आलीय. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. मात्र, यावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकल्यात आलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

16 May 2024, 13:17 वाजता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी

 

Nashik Eknath Shinde : नाशिकमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आलीय.. नाशिक हेलिपॅडवर मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगा तपासण्यात आल्यात. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदेंकडे असलेल्या बॅगांसंबंधी संजय राऊतांनी गंभीर आरोप केले होते. मुख्यमंत्री नाशिक दौ-यावर असतानाच हे आरोप झाले होते, आज मुख्यमंत्री पुन्हा नाशिकमध्ये आहेत.. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासण्यात आल्याची चर्चा आहे.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 May 2024, 13:11 वाजता

मनोज जरांगेंची बीडमधील होणारी सभा रद्द

 

Manoj Jarange : मनोज जरांगेंची 8 जूनची सभा रद्द करण्यात आलीय.. उन्हाची तीव्रता, पाणी नसल्यानं सभा रद्द करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय. बीडच्या नारायण गडावरील मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी भव्य सभा घेणार होते. मात्र बीडमधली मनोज जरांगेंची सभा रद्द करण्यात आलीय.. 

16 May 2024, 12:27 वाजता

उपमुख्यमंत्री अजित पवार गेले कुणीकडे?

 

Ajit Pawar : ऐन प्रचाराच्या धामधुमीत अजित पवार प्रचारापासून दूर आहेत...चौथा टप्पा संपल्यानंतर अजित पवार प्रचारात गैरहजर असल्याने अजित पवार नक्की कुठे आहेत याचीच चर्चा सुरू आहे...नरेंद्र मोदींच्या नाशिकच्या सभेलाही अजित पवारांनी दांडी मारली...खरंतर, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या पक्षाचे 4 आमदार आहेत...मात्र, या सभेला छगन भुजबळांनीच फक्त हजेरी लावली...तर मुंबईतील मोदींच्या रोडशो मध्येही अजित पवार दिसले नाहीत...वाराणसीमध्ये मोदींचा अर्ज भरतानाही अजित पवार गैरहजर होते...त्यांच्या ऐवजी प्रफुल्ल पटेल यांनी हजेरी लावली होती...अजित पवारांच्या पक्ष कार्यालयाकडूनही काहीच माहिती देण्यात आलीय नाहीये...मात्र, आता उद्याच्या महायुतीच्या सभेत तरी अजित पवार दिसणार का...? याची चर्चा सुरूये...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 May 2024, 11:44 वाजता

संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका

 

Sanjay Raut On PM Modi : खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर टीका केलीय...पार्टी चोरी करण्यास मोदींनी मदत केलीय...पार्टी चोरांचे सरदार हे पंतप्रधान मोदीच आहेत...आता 4 जूननंतर भाजपचं अस्तित्व राहिल का? असा सवाल उपस्थित करत राऊतांनी मोदींवर टीका केलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 May 2024, 11:39 वाजता

मोदींच्या मुंबईतील रोड शोवर पवार आणि राऊतांची टीका

 

Sharad Pawar, Sanjay Raut On Modi Road Show : मुंबईतील मोदींच्या रोड शोवरून राऊत आणि शरद पवारांनी टीका केलीय...मुंबईत रोड शो काढणं हे शहाणपणाचं लक्षण नाही...अशी टीका शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर केलीय. मोदींनी रोड शो काढला तो प्रामुख्यानं गुजराती भाग होता असा टोलाही पवारांनी लगावला...तर मुंबईत 16 लोकांचा मृत्यू झाला तिथे मोदींचा रोड शो हे अमानुष असल्याची टीका संजय राऊतांनी केलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा -