लोणावळ्यातील भुशी डॅमवर संध्याकाळी 6 नंतर बंदी

पिकनिकसाठी भुशी डॅमकडे जाण्याच्या विचारात असाल तर आधी नियमावली वाचा...

Updated: Jul 11, 2018, 02:09 PM IST
लोणावळ्यातील भुशी डॅमवर संध्याकाळी 6 नंतर बंदी

लोणावळा : विकेएन्डला पावसाळी पिकनिकसाठी जर तुम्ही लोणावळ्यातील भुशी डॅमकडे जाण्याच्या विचारात असाल, तर जरा काळजीपूर्वक ऐका..  भुशी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर सायंकाळी पाच नंतर वाहनांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तर संध्याकाळी सहा वाजल्यानंतर धरण आणि टायगर्स पॉईंट, लायन्स पॉईंटवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. तसचं शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी लोणावळा गावात जाणाऱ्या लक्झरी बस, मिनीबस, टेंपो ट्रॅव्हलर यासारख्या अवजड वाहनांवर पूर्णत: बंदी करण्यात आली आहे. पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या वाहनांमुळे पुणे-मुंबई महामार्ग, भुशी रस्त्यावर प्रचंड कोंडी होते या पार्श्वभूमीवर लोणावळा पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.