राज्यात एटीएसची छापेमारी, पुण्यातून एक संशयित अटकेत

 पुण्यातून आणखी एक संसयिताला अटक करण्यात आलेय. दरम्यान, नालासोपाऱ्यातून आणखी दोघांना अटक करण्यात आलेय. राज्यात एकूण तीन जणांना आज अटक करण्यात आलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 10, 2018, 07:34 PM IST
राज्यात एटीएसची छापेमारी, पुण्यातून एक संशयित अटकेत

मुंबई : नालासोपारा येथून सनातन संस्थेचा साधक वैभव राऊत याच्या घरावर महाराष्ट्र एटीएस पथकाने छापा मारला. त्याच्या घरातून बॉम्ब आणि बॉम्ब बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या छापेमारीनंतर पुण्यातून आणखी एक संसयिताला अटक करण्यात आलेय. दरम्यान, नालासोपाऱ्यातून आणखी दोघांना अटक करण्यात आलेय. राज्यात एकूण तीन जणांना आज अटक करण्यात आलेय.

महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी दहशतवाद विरोधी पथकाची (एटीएस) छापे चालू आहेत. बुधवारी रात्री पालघरच्या नालासोपारा भागातून वैभव राऊतला अटक केल्यानंतर एटीएसने शुक्रवारी पुण्यातून संशयिताला ताब्यात घेतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एटीएसने पुण्यातील एका संशयितास चौकशीसाठी अटक केली. दरम्यान, नालासोपाऱ्यातल्या अवैध शस्त्रसाठ्याप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आलीय. वैभव राऊतपाठोपाठ शरद कळसकर याला नालासोपाऱ्यातून तर सुधनवा गोंधळेकर याला पुण्यातून अटक करण्यात आलीय. या तिघांना १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. 

शरदच्या घरातून काही बॉम्ब बनवण्याची कागदपत्रंही जप्त करण्यात आलीय. येऊ घातलेल्या सणांच्या दिवसात घातपात करण्याचा कट होता अशी माहिती सूत्रांनी दिलीय. गोंधळेकर हा मुळचा साताऱ्यातील करंज पेठचा आहे.  एटीएसचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. तिघांना अटक करण्यात आली असून अधिकचा तपास करून यामागचं तथ्य समोर येईल असं गृहराज्यामंत्री केसरकरांनी सांगितलंय.

सुरुवातीला वैभव राऊत हा सनातन संस्थेचा साधक असल्याचे सांगितले जात होते. मात्र, 'सनातन'चे वकील संजीव पुनाळेकर यांनी वैभव राऊत हा आमचा कार्यकर्ता नसल्याचे स्पष्ट केले.   वैभव राऊतनंतर एटीएसकडुन आणखी दोघांना अटक केली आहे. पुण्यातून सुधनवा गोंधळेकरला तर नालासोपाऱ्यातुन आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. अवैध शस्त्रसाठ्याप्रकरणी नालासोपाऱ्यातुन शरद कळसकरला अटक करण्यात आलीआहे. 

आगामी सणांमध्ये घातपात करण्याची तयारी करण्यात येत होती असे म्हटले जात आहे. नालासोपारा येथील भांडारआळी परिसरात वैभव राऊत याच्या घरावर आणि दुकानावर एटीएसच्या पथकाने गुरुवारी रात्री उशीरा छापा घातला. यावेळी पोलिसांना आठ देशी बॉम्ब आणि स्फोटके तयार करण्यासाठी लागणारे साहित्य मिळाले. पोलिसांनी वैभव राऊतला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरु आहे

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close