'शिक्षणमंत्र्यांवर मेंटल हॅरेसमेंटची केस दाखल करा'

 'शिक्षणमंत्र्यांवर मेंटल हॅरेसमेंटची केस दाखल करा' अशी टीका शिवसेनेच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Aug 19, 2017, 12:07 AM IST
  'शिक्षणमंत्र्यांवर मेंटल हॅरेसमेंटची केस दाखल करा' title=

 मुंबई:  'शिक्षणमंत्र्यांवर मेंटल हॅरेसमेंटची केस दाखल करा' अशी टीका शिवसेनेच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

आधीच्या सरकारमध्ये विद्यापीठात कमी घोळ होता. विद्यार्थी महाराष्ट्रातील मोठ्या घटकाला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे ते म्हणाले. मुंबई विद्यापीठाच्या निकाल घोळावर आदित्य ठाकरे यांनी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
   मुख्यमंत्र्यांनी एक तारीख दिली ती पण निघून गेली, मुख्यमंत्र्यांना तोंडावर पाडण्याचं कोण काम करतंय का ? असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.

विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या निकालामुळे मुंबई विद्यापीठ बदनाम झाले आहे. या पार्श्वभुमीवर आदित्य ठाकरे यांनी हे भाष्य केले आहे. रखडलेल्या निकालासाठी जबाबदार कोण आहे ?, डेडलाईन देऊनही निकाल लागले नाही.

मुंबई विद्यापीठाच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचंही आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितले. 

 आयएएस नेमावा    

विद्यापीठाच्या या समस्येप्रकरणी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेली होती. तेव्हा त्यांच्याकडे विद्यापीठावर आयएएस अधिकारी एडमिनिस्ट्रेटर नेमावा अशी मागणी केल्याचे आदित्या ठाकरे म्हणाले.  तसंच  मेरीट ट्रॅक ही कंपनीच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.