अर्ज न भरताही आणखी एका आमदाराच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम

मोरे यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची १५ हजार ४०० रुपये एवढी रक्कम जमा झाल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं. 

Updated: Dec 17, 2017, 08:57 AM IST
अर्ज न भरताही आणखी एका आमदाराच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम  title=

जळगाव :  अर्ज न करता जळगावात राष्ट्रवादीचे खासदार वसंतराव मोरे यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचं समोर आलंय.

मोरे यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची १५ हजार ४०० रुपये एवढी रक्कम जमा झाल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं. 

बोगस लाभार्थी 

या निधीची ख-या शेतक-यांना गरज असल्यानं मोरे यांनी लगेचच ही रक्कम परत केली. विना अर्ज भरूनही एकट्या पारोळा तालुक्यात १२ ते १३ जणांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचं सांगण्यात येतेय.

त्यामुळे कर्जमाफी देताना बोगस तसंच राजकीय पदाधिकारी लाभार्थी बनू नये याकरिता शासनानं एवढी काळजी घेऊनही त्यातील घोळ समोर आल्यानं या प्रक्रियेवर प्रश्चचिन्ह निर्माण झालंय. 

आबीटकरांना २५ हजार 

कोल्हापूरातील राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबीटकर यांनी कोणताही अर्ज अथवा ऑनलाईन प्रक्रिया केली नव्हती. त्यांनाही २५ हजारांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचं प्रकरण समोर आलं होतं