'मुक्त'ची भाषा राजकारणात चालते, संघात नाही - मोहन भागवत

मुक्तची भाषा राजकारणात चालते, संघात नाही, संघाला सगळ्यांना सामावून घ्यायचंय, असं वक्तव्य केलंय मोहन भागवत यांनी

Jaywant Patil Updated: Apr 1, 2018, 11:26 PM IST

पुणे : मुक्तची भाषा राजकारणात चालते, संघात नाही, संघाला सगळ्यांना सामावून घ्यायचंय, असं वक्तव्य केलंय मोहन भागवत यांनी. लेखक आणि  भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी लिहिलेल्या तसेच अनुवादित केलेल्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आज पुण्यात पार पडला. त्यावेळी बोलताना मोहन भागवतांनी हे वक्तव्य केलं, तर मुक्त भारताची भाषा करण्यापेक्षा युक्त भारताची भाषा करायला हवी, असा सल्ला परराष्ट्र संबंधांचे तज्ज्ञ संदीप वासलेकर यांनी याच कार्यक्रमात दिला.