पुढच्या आठवड्यात मान्सूनचा जोर कमी

मुंबई ठाण्यापासून आता मान्सून अहमदनगर बुलडाणा अमरावती गोंदीयातपर्यंत सक्रीय झाला आहे. 

Updated: Jun 13, 2018, 09:15 AM IST
पुढच्या आठवड्यात मान्सूनचा जोर कमी

मुंबई : मुंबई ठाण्यापासून आता मान्सून अहमदनगर बुलडाणा अमरावती गोंदीयातपर्यंत सक्रीय झाला आहे. उत्तरेकडील जिल्ह्यात मान्सून सक्रीय होण्यास अजून काही दिवस लागू शकतात. गेल्या आठवड्यात पाऊस मुंबईसह इतरत्र चांगलाच बरसला. मात्र पुढच्या आठवड्यात मान्सूनचा जोर कमी असेल असा अंदाज वेधशाळेने वर्तवला होता. मात्र याचा पावसाच्या सरासरीवर कोणताही परिणाम होणार नाही असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. 

मुंबईं ठाण्यासह मान्सून आत्ता अहमदनगर बुलढाणा अमरावती आणि गोंदीयात देखील सक्रीय झाला आहे.  उत्तरेकडील जिल्ह्यात मान्सून सक्रीय होण्यास अद्याप काही दिवस लागू शकताता.  गेल्या आठवड्या पाऊस मुंबईसह ईतरत्र चांगलाच बरसला असला तरी पुढील आठवढाभर मान्सूनचा जोर कमी असल्याची माहीती कुलाबा वेधशाळेने दिली आहे. येत्या आठवड्या मराठवाडा आणि आसपासच्या परीसरात पाउस अगदीच कमी पडण्याच अनुमान आहे. मात्र याचा कोणताही परिणाम हा सरासरी पावसावर होणार नसल्याच वैणानिकांच म्हणण आहे. 

आत्ता पर्यंत मुंबई सह राज्यात चांगला पाउस झाला आहे. आत्ता पर्यंत मुंबईत २८५.५ मीमी पावसाची नोंद झाली असून तो सरासरीच्या १७४ टक्के अधिक आहे तर राज्यात आत्ता पर्यंत  विदर्भ वगळता १०६.५ मीमी पाउस झाला असून तो सरासरीच्या १२० टक्के अधिक आहे.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close