नांदेड महापालिकेतील पराभवाची जबाबदारी संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्विकारली

नांदेड महापालिका निवडणुकीत भाजपच्या झालेल्या सपशेल पराभवाची पूर्ण जबाबदारी आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी स्विकारली आहे. तसेच, हा पराभव म्हणजे भाजपचा परतीचा प्रवास आहे हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचं विधानही निलंगेकरांनी फेटाळून लावले आहे.

Updated: Oct 15, 2017, 03:50 PM IST
नांदेड महापालिकेतील पराभवाची जबाबदारी संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्विकारली title=

नांदेड : नांदेड महापालिका निवडणुकीत भाजपच्या झालेल्या सपशेल पराभवाची पूर्ण जबाबदारी आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी स्विकारली आहे. तसेच, हा पराभव म्हणजे भाजपचा परतीचा प्रवास आहे हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचं विधानही निलंगेकरांनी फेटाळून लावले आहे.

नांदेड महापालिका हा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पर्यायाने कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. लोकसभा, विधानसभा निवडणुकीवेळी आलेल्या मोदी लाटेतही हा बालेकिल्ला भक्कमपणे मजबुत होता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सुरूंग लावायचाच, असा चंग भाजप नेतृत्वाने बांधला होता. त्यासाठी भाजप आणि कॉंग्रेसकडूनही ही निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची करण्यात आली होती.

अशोकरावांच्या किल्ल्याला भगदाड पाडण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेऊन होते. मुख्यमंत्र्यांसह राज्यभरातील अनेक भाजप नेत्यांनी नांदेडमध्ये सभा घेऊन प्रचाराचा धडाका उडवून दिला होता. अखेरच्या टप्प्यात अशोक चव्हाण यांना व्यक्तीगत लक्ष्य करत, त्यांच्या सदनिका घोटाळ्याचाही मुद्दा भाजपने उकरून काढला. भाजपच्या हल्ल्याला अशोक चव्हाण आणि कॉंग्रेसने सडेतोड प्रत्युत्तर दिले. अखेर नांदेडच्या जनतेने आपले पूर्ण बहुमत पारड्यात टाकून पुन्हा एकदा कॉंग्रेसवर विश्वास दाखवला.