धक्का लागल्याच्या वादातून तरुणाची हत्या...

पुण्यातील बाणेर रोड परिसरात एका किरकोळ कारणावरून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 18, 2017, 03:37 PM IST
धक्का लागल्याच्या वादातून तरुणाची हत्या...  title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

पुणे : पुण्यातील बाणेर रोड परिसरात एका किरकोळ कारणावरून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. अख्तर खान असे या मृत तरुणाचे नाव आहे. आज सकाळी झालेल्या या घटनेचा अधिक तपास चतुश्रुंगी पोलीस करत आहेत. 

सकाळी साडेसहाच्या सुमारास बाणेर रोडवरील सकाळनगर बसस्टॉप जवळील चहाच्या टपरीवर अख्तर इम्तियाज खान (वय २०) आणि करीम सय्यद (वय २४) हे दोघेजण चहा पीत उभे होते. हे दोघेही इंदिरानगर परिसरात राहतात. त्यावेळी शेजारी उभ्या असलेल्या एका व्यक्तीला त्यांचा धक्का लागला. यावरुन दोघांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर चिडलेल्या आरोपीने अख्तर खान आणि करीम सय्यद यांच्यावर कुकरीने वार केले. त्यात अख्तर खान याचा मृत्यू झाला तर करीम सय्यद गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. या घटनेनंतर आरोपी पसार झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.