जालनामध्ये व्यापाऱ्याच्या हत्येने खळबळ

शहरातील प्लॉटिंग व्यावसायिक नितीन कटारिया यांची अज्ञात मारेक-यांनी त्यांच्याच घरासमोर निर्घृणपणे हत्या केली. या घटनेमुळे जालना शहरात खळबळ उडालीय आहे. त्यांच्या हत्येचा हा सर्व प्रकार परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला.

Updated: Sep 20, 2017, 02:27 PM IST
जालनामध्ये व्यापाऱ्याच्या हत्येने खळबळ title=

जालना : शहरातील प्लॉटिंग व्यावसायिक नितीन कटारिया यांची अज्ञात मारेक-यांनी त्यांच्याच घरासमोर निर्घृणपणे हत्या केली. या घटनेमुळे जालना शहरात खळबळ उडालीय आहे. त्यांच्या हत्येचा हा सर्व प्रकार परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला.

प्लॉटिंग व्यावसायिक नितीन ताराचंद कटारिया हे शहरातील मोदीखाना भागात राहतात. त्यांची खरपूडींमध्ये साडेतीन एकर शेतजमीन आहे. सहा महिन्यापूर्वी त्यांना शहरातील काही लोकांनी शेतात येऊन 50 लाख रुपयांची खंडणी मागीतली होती.

यासंदर्भात त्यांनी आपल्याला जमिनीच्या वादातून काहीजण खंडणी मागत असून आपल्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार पोलिसांकडे होती. या घटनेनंतर पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. तर नऊ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.