सफाई केली नाही तर... हे घड्याळ फसवेगिरी करणार उघड

कामावर नसूनही असल्याची फसवेगिरी करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना आता कामचुकारपणा करता येणार नाही. यावर आयुक्तांनी चांगली शक्कल लढविलेय.

Updated: Nov 22, 2017, 07:34 PM IST
सफाई केली नाही तर... हे घड्याळ फसवेगिरी करणार उघड title=

अमर काणे / नागपूर : कामावर नसूनही असल्याची फसवेगिरी करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना आता कामचुकारपणा करता येणार नाही. यावर आयुक्तांनी चांगली शक्कल लढविलेय.

कर्मचाऱ्यांकडून सात्यत्याने केल्या जात असलेल्या कामचुकारपणावर नागपूर महापालिकेने रामबाण उपाय शोधत 'जीपीएस' प्रणाली लावलेल्या मनगटी घड्याळांचा प्रयोग सुरु केला आहे.

प्रायोगिक तत्वावर १० स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मनगटाला हे घड्याळ लावण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्या ठिकाणी कचरा उचलण्यात येत आहे. तसेच कोणत्या ठिकाणी सफाई सुरु आहे, याची माहिती नागपूर पालिकेला मिळत आहे. त्यामुळे कामात दिरंगाई करणे किंवा कामचुकारपणा करता येणार नाही.