पोलीस शिपायाचा गुंडांसोबत डान्स, व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ

Updated: Sep 20, 2018, 01:57 PM IST

नागपूर : नागपूर शहर पोलिसातला एक शिपाई गुन्हेगारांसह एका कार्यक्रमात नृत्य करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोतवाली पोलीस स्थानकातला जयंता नावाचा पोलीस शिपाई ताजबागचा गँगस्टर अबू आणि शांतीनगरमधील गुन्हेगार अशोक बावाजीसोबत दिसून येतो आहे. दोन्ही गुन्हेगार शिपायासोबत नृत्य आणि मौजमजा करत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे.

दरम्यान यातला अशोक बावाजी तडीपार आहे. यामुळे नागपूरमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं आहे. गुंडासोबतचा पोलिंसाचा व्हिडिओमुळे सर्व सामान्य संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.