जन्मदात्या मातेनंच नाल्यात फेकून दिलं... पण, 'ती' चिमुरडी बचावली!

पिंपरी-चिंचवडमध्ये जन्मदात्या आईनेच अवघ्या १० दिवसांच्या मुलीला नदीत फेकून दिल्याची घटना ताजी असतानाच नांदेडमध्येही अशीच घटना उघडकीस आलीय... सुदैवानं ही चिमुरडी मात्र बचावली आहे. 

Updated: Aug 18, 2017, 02:11 PM IST
जन्मदात्या मातेनंच नाल्यात फेकून दिलं... पण, 'ती' चिमुरडी बचावली! title=

नांदेड : पिंपरी-चिंचवडमध्ये जन्मदात्या आईनेच अवघ्या १० दिवसांच्या मुलीला नदीत फेकून दिल्याची घटना ताजी असतानाच नांदेडमध्येही अशीच घटना उघडकीस आलीय... सुदैवानं ही चिमुरडी मात्र बचावली आहे. 

अवघ्या दोन महिन्यांच्या मुलीला नाल्यात फेकून निर्दयी माता फरार झाल्याची हृदयद्रावक घटना नांदेड जिल्ह्यातील देगलूर इथं उघडकीस आलीय.

ही महिला नाल्यात काहीतरी फेकत असल्याचं परिसरातील काही तरुणांनी पाहिलं... परंतु तेव्हापर्यंत ही महिला बाळाला फेकून तिथून पसारही झाली होती. 

नाल्यातून बाळाचा आवाज ऐकून लगेचच त्या तरुणांनी प्रसंगावधान राखत चिमुरडीला बाहेर काढलं... तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. या चिमुरडीला आंघोळ घालत त्यांनी तिला देगलूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. 

या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून देगलूर पोलीस त्या निर्दयी मातेचा शोध घेत आहेत.