काँग्रेसने नांदेडचा गड राखला, भाजपची घोर निराशा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या नांदेड-वाघाळा महानगरपालिकेची मतमोजणी सुरु झाली आणि काँग्रेसची परीक्षा सुरु झाली. मात्र, सुरुवातीपासून काँग्रेसने आघाडी घेतली. त्यामुळे भाजपची अडचण वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजपला अशोक चव्हाण भारी पडल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.

काँग्रेसने नांदेडचा गड राखला, भाजपची घोर निराशा

नांदेड : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या नांदेड-वाघाळा महानगरपालिकेची मतमोजणी सुरु झाली आणि काँग्रेसची परीक्षा सुरु झाली. मात्र, सुरुवातीपासून काँग्रेसने आघाडी घेतली. त्यामुळे भाजपची अडचण वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजपला अशोक चव्हाण भारी पडल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.

पाहा लाईव्ह निकाल, पाहण्यासाठी इथं करा क्लिक

संपूर्ण राज्याचं लक्ष वेधल्या गेलेल्या नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीच्या ८१ जागांसाठी मतमोजणी सुरू झाली,. मतमोजणीच्या ताज्या आकडेवारी नुसार काँग्रेसने ३७ जागांवर तर भाजपनं २ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे नांदेड महापालिकेवरील वर्चस्वासाठी काँग्रेसची बाजू भक्कम दिसून आली. तर भाजपमध्येच अस्तित्वासाठी लढाई सुरु असल्याचे दिसून आलेय.

आज सकाळी नांदेड-वाघाळा महापालिकेच्या मतमोजणीला सुरुवात झाली. काँग्रेस आणि भाजपपाठोपाठ शिवसेना आणि एमआयएम प्रत्येकी दोन जागांवर आघाडीवर घेतली होती. एकूण २० प्रभागांतील ८१ जागांसाठी मतमोजणी सुरू होती. या निवडणुकीत ५७८ उमेदवार आपलं नशिब आजमवत आहेत. एकूण ३ लाख ९६ हजार ८७२ मतदार होते, त्यांच्यासाठी ५५० मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती.

गतनिवडणुकीत काँग्रेसला ४२, शिवसेना १४, भाजप २, एमआयएम ११ आणि संविधान पार्टीला २ जागा मिळाल्या होत्या.