युती झाली तर भाजपसोबत जाणार नाही- नारायण राणे

आगामी निवडणुकीच्या तोंडावर नारायण राणे काय भूमिका घेतात याकडे हे पाहण महत्त्वाचे 

Updated: Dec 30, 2018, 10:19 PM IST
युती झाली तर भाजपसोबत जाणार नाही- नारायण राणे  title=

सिंधुदुर्ग : कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. दरम्यानच्य काळात भाजपने नारायण राणेंना राज्यसभेवर पाठवले. आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होणारच असा विश्वास नारायण राणेंना आहे. पण असे झाले तर आपण भाजपसोबत नसणारे हे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.  सिंधुदुर्गमधील पत्रकार परिषदेत राणेंनी भाजपला लक्ष केले. 'पाच राज्यातील परभवानंतर भाजपने धडा घ्यावा' असे नारायण राणे म्हणालेत. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर नारायण राणे काय भूमिका घेतात याकडे हे पाहण महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजपवर टीका 

'सेना भाजपची युती झाली तर भाजपसोबत जाणार नाही' असे नारायण राणेंनी जाहीर केले आहे. 'या सरकराने दिलेलं कोणतेही आश्वासन पाळले नाही' अशी टीकाही राणेंनी भाजपावर केलीये. सेना आणि भाजप दोघांनाही एकमेकांची गरज आहे. त्यामुळे हे दोघेही भांडून घेत आहेत, असा टोला नारायण राणे यांनी लगावला. दरम्यान एनडीए सोडण्याबाबत आपण काही बोललो नसून स्वतंत्र लढण्याबाबत बोललो असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.