दाभोलकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे जळगावपर्यंत, दोन जण ताब्यात

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे जळगाव जिल्ह्यातही असल्याचे पुढे आलेय.

Updated: Sep 7, 2018, 09:51 PM IST
दाभोलकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे जळगावपर्यंत, दोन जण ताब्यात

जळगाव : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे जळगाव जिल्ह्यातही असल्याचे पुढे आलेय. साकळी गावातून आणखी एक तरुण एटीएसने आपल्या ताब्यात घेतला आहे. विजय लोधी असे एटीएसने ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. लोधी याचा कापूस खरेदीचा व्यवसाय आहे.

जळगावमधील साकळी येथून राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आज गुरुवारी दुपारी विजय याला ताब्यात घेतले. तरुणाच्या घराची पोलिसांनी झाडाझडतीही घेतली. यानंतर पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले. एटीएसने तब्बल अडीच तास त्याच्या घराची झाडाझडती घेतली. त्याच्या घरातून पोलिसांनी संशयास्पद साहित्य जप्त केल्याची माहिती आहे.

वासुदेव सूर्यवंशी या युवकाला ताब्यात

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या संशयावरून दहशतवादी विरोधी पथकाने जळगाव जिल्ह्यातील साकळी येथील २८ वर्षीय वासुदेव सूर्यवंशी या युवकाला ताब्यात घेतल्यानं खळबळ उडालीय. पथकाने सूर्यवंशी याला ताब्यात घेताच तात्काळ एका वाहनाने घेवू गेले. 

पथकासोबत आलेल्या दुस-या वाहनातील पथकाने सूर्यवंशी यांच्या घरात बंद दरवाज्यात सुमारे अडीच ते तीन तास झाडाझडती घेतलीय. या कारवाईबाबत मात्र एटीएस पथकाने प्रचंड गोपनीयता बाळगली. अटकेतील तरुण जळगाव जिल्हातील  मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की येथील मुळ रहिवासी असून तो मोटारसायकल गॅरेजचा व्यवसाय करतो. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close