निवडणूक प्रचारात खुलेआम पैठणी वाटप

 निवडणूक प्रचारात खुलेआम पैठणी आणि साडी वाटप करण्यात आलंय. 

Updated: Jun 25, 2018, 01:56 PM IST

नाशिक : निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे वाटप आणि आमिष देणं ही काही नवी गोष्ट नाही. मात्र सुशिक्षित अशा शिक्षक विधान परिषद निवडणूक प्रचारातही असाच प्रकार होत असल्याचे समोर आलंय. नाशिक विधानपरिषद निवडणूक प्रचारात खुलेआम पैठणी आणि साडी वाटप करण्यात आलंय. याशिवाय प्रचारात पैशाचाही मोठ्या प्रमाणात वापर झालाय.

साड्यांची होळी 

प्रत्येक मतासाठी उमेदवारांकडून दोन हजार ते पाच हजार रुपये पाकिटातून देण्यात येत असल्याचे समोर आलंय. नंदुरबार जिल्ह्यात तळोदा तालुक्यातील तळवे इथं साड्यांची होळी करण्यात आलीय. तर धुळ्यातही असाच प्रकार घडलाय. या सगळ्या प्रकरणी शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय.