विहिरीचा कढडा ढासळून कामगार दबला

चार दिवस उलटूनही  अद्याप घटनेत दबल्या गेलेल्या कामगाराचा शोध लागलेला नाही.

Updated: Dec 17, 2017, 02:54 PM IST
विहिरीचा कढडा ढासळून कामगार दबला  title=

नाशिक : विहिरीला रिंग टाकण्याचे काम सुरु असताना विहिरीचा कठडा ढासळून झालेल्या दुर्घटना समोर आली आहे. यामध्ये राजस्थानी कामगार दबला गेल्याची घटना नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहणेर गावात घडली. 
 
चार दिवस उलटूनही  अद्याप घटनेत दबल्या गेलेल्या कामगाराचा शोध लागलेला नाही. मुकेश  गोपाळ  सैनी असे विहिरीत दबलेल्या कामगारांचे  नाव आहे. 

शोधण्याच काम सुरू  

नाशिक आणि मालेगाव अग्निशमन पथकासह आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाकडून मुकेशला शोधण्याचं काम सुरु आहे. मात्र विहीरीला ७० फूट पाणी अशल्याने मदत कार्यात अडथळे येतायत. 

मुकेशला शोधण्यास अपयश 

विहीरीतील पाणी उपसण्यासाठी ८ विद्युत पंप लावण्यात आलेत. तरी पाणी उपसले जात नसल्याने मुकेशचा पत्ता लागलेला नाही.