नाशिकच्या तरूणांचं तुकाराम मुंढेंना 'वेलकम'

 तुकाराम मुंढे यांच्या स्वागताचा फीवर आतापासून सोशल मीडियावर दिसू लागला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 8, 2018, 01:54 PM IST

नाशिक : नाशिकमध्ये तुकाराम मुंढे यांचं जंगी स्वागत होईल की काय असं दिसतंय, कारण तुकाराम मुंढे यांच्या स्वागताचा फीवर आतापासून सोशल मीडियावर दिसू लागला आहे.

सोशल मीडियावर उस्फूर्त स्वागत

नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्र तुकाराम मुंढे उद्या स्वीकारणार आहेत. मात्र त्यांचं स्वागत नाशिकच्या तरुणाईन सोशल मीडियावर उस्फुर्त स्वागत केले आहे. कुणी आपले स्टेटस तर कुणी तुकाराम तुकाराम पोस्ट टाकत राजकीय नेत्यांनी हुर्यो केली आहे.

नाशिकच्या तरूणाईचा सोशल मीडियावर जल्लोष

नाशिकमध्ये तुकाराम मुंढे आयुक्तपदावर रूजू होण्याआधीच तरूणाईने सोशल मीडियावर जल्लोष सुरू केला आहे, तरूणांकडून कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकाऱ्यांबद्दल अधिक आकर्षण असल्याचं दिसतंय. मात्र तुकाराम मुंढे ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी, राजकारण्यांचं फावत नसल्याने, ते थेट त्यांच्या बदलीसाठी मंत्रालयात आणि सीएम ऑफिसमध्ये बदलीचा जप करतात. आणि कर्तव्यदक्ष तुकाराम मुंढे फार कमी काळ टिकतात आणि यानंतर पुन्हा त्यांच्या बदलीचे आदेश होतात.

तुकाराम मुंढेंचा स्वच्छ कारभार पुढाऱ्यांना नकोसा?

तुकाराम मुंढे देखील काहीही तक्रार न करता, आपल्या बदलीचा आदेश हसत हसत स्वीकारतात आणि यापुढेही चांगलं काम करत राहणार असल्याचं सांगत, बदलीच्या पुढच्या ठिकाणावर रूजू होतात. पुन्हा तेच पारदर्शक काम आणि पुन्हा राजकारण्यांना वाटणारा तो त्रास, यामुळे पुन्हा चांगल्याची वाट लागते आणि राजकारण्यांचे बदलीचे अप्रत्यक्ष मोर्चे मंत्रालयावर निघतात.

सरकार करतं मुंढेंची झटपट बदली

आयुक्त तुकाराम मुंढे यांची यापूर्वी नवी मुंबई येथून बदली करण्यात आली, ते तेथेही आयुक्तपदी होते, तेथे तर सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यांचा विरोध केला होता, यानंतर तुकाराम मुंढे पुण्यात आले, पण पुण्यातही तुकाराम मुंढे यांना जास्त काळ टिकू दिलं गेलं नाही, आता तुकाराम मुंढे यांची बदली नाशिकला झाली आहे, नाशिकला मुंढेंना किती काळ राजकारणी टिकू देतात, ते लवकरच दिसेल.