'शेतकऱ्यांना मालाचे पैसे मिळत नाही आणि यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं'

 माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घेतलं.

Updated: Oct 9, 2018, 07:28 PM IST
'शेतकऱ्यांना मालाचे पैसे मिळत नाही आणि यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं' title=

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसची संविधान बचाव रॅली पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घेतलं.

शेतकऱ्यांना तूर, हरभऱ्याचे पैसे मिळत नाही आणि फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं काय बघता, असा सवाल पवारांनी उपस्थित केलाय.तसंच दुष्काळाच्या मुद्यावरुनही त्यांनी सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. 

सरकारच्या नाकारतापणा दिसून येत आहे. हे सरकार श्रीमंतांचे सरकार आहे. गोरगोरिबांना वाऱ्यावर सोडण्यात येत आहे. चोक्सी, नीरव मोदी यांनी कित्येक कोटी घेऊन परदेशात गेलेत. हे अर्थमंत्री, नरेंद्र मोदी यांना दिसत नाही. नोटबंदीमुळे देशोधडीला लागलो. पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहे. मात्र, यांना शेतकरी आणि गरीबांचे देणेघेणे नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली.

देशातील हे श्रीमंताचे सरकार उलथवून टाकले पाहिजे. त्याशिवाय या देशात चांगले दिवस येणार नाही, असा हल्लाबोल अजित पवार यांनी यावेळी केला.