नेरूळ- उरण रेल्वेमार्गाचे काम युद्धपातळीवर, डिसेंबर अखेर धावणार रेल्वे?

सिडको आणि सेंट्रल रेल्वे तर्फे  नेरूळ- उरण रेल्वेमार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे.  एकूण  २७ किलोमीटर लांबीच्या मार्गापैकी नेरूळ- खारकोपर या ८ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे काम सध्या सुरू आहे. डिसेम्बर २०१७ पर्यंत खारकोपर पर्यंत चा रेल्वे मार्ग सुरूर करण्यात येणार आहे.  हा मार्ग वेळेत सुरू झाल्यास उलवे परिसरात मोठ्या प्रमाणात राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी मुंबई चा प्रवास सुखकर ठरणार आहे. 

Updated: Jul 18, 2017, 10:33 PM IST
नेरूळ- उरण रेल्वेमार्गाचे काम युद्धपातळीवर, डिसेंबर अखेर धावणार रेल्वे? title=

नवी मुंबई : सिडको आणि सेंट्रल रेल्वे तर्फे  नेरूळ- उरण रेल्वेमार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे.  एकूण  २७ किलोमीटर लांबीच्या मार्गापैकी नेरूळ- खारकोपर या ८ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे काम सध्या सुरू आहे. डिसेम्बर २०१७ पर्यंत खारकोपर पर्यंत चा रेल्वे मार्ग सुरूर करण्यात येणार आहे.  हा मार्ग वेळेत सुरू झाल्यास उलवे परिसरात मोठ्या प्रमाणात राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी मुंबई चा प्रवास सुखकर ठरणार आहे. 

नेरुळ  ते खारकोपर हा पहिला ठप्प असून पाच रेव्ले स्टेशन यात येत आहेत ,  या मार्गावरील बामणडोंगरी आणि खारकोपर या स्थानकांच्या उभारणीचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येत  आहे. त्याचवेळी तरघर या रेल्वे स्थानकाचीही उभारणी करण्यात येणार आहे. 

तरघर हे रेल्वे स्थानक प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारे महत्वाचे स्थानक मानले जात आहे. त्यामुळे या स्थानकाच्या उभारणीकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. याव्यतिरिक्त नेरूळ आणि जुईनगर स्थानकांच्या धर्तीवर बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्थानकांबाहेर व्यापारी पद्धतीचे गाळे बांधले जाणार असल्याचीही माहितीही सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांनी दिली . 

नेरूळ- खारकोपर या ८ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गासाठी गेल्या आठवड्यात रूळांची चाचणी घेण्यात आली. रेल्वे स्थानकाची काम सुरू आहेत ,  त्यामुळे येत्या डिसेंबर २०१७ पर्यंत हा रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल, असा विश्वास सिडको व्यक्त करत आहे.