पिंपरी-चिंचवड मनपात आता उड्डाणपुलाच्या रँपवरून नवा वाद

सातत्याने वादात राहण्याचा पिंपरी चिंचवड महापालिकेने चंगच बांधलाय. आता उड्डाणपुलाच्या रँपवरून नवा वाद पेटलाय. 

Updated: Nov 10, 2017, 11:17 PM IST
पिंपरी-चिंचवड मनपात आता उड्डाणपुलाच्या रँपवरून नवा वाद

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : सातत्याने वादात राहण्याचा पिंपरी चिंचवड महापालिकेने चंगच बांधलाय. आता उड्डाणपुलाच्या रँपवरून नवा वाद पेटलाय. 

सुनियोजीत शहर अशी पिंपरी चिंचवडची ओळख... मात्र या शहरातली अनेक विकास कामं चुकीच्या पद्धतीने केली जात असल्याचं अनेकदा पुढे आलंय. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे एम्पायर इस्टेट या अत्यंत गजबजलेल्या वसाहतीसमोरून जाणाऱ्या उड्डाणपुलाचं. 

या उड्डाणपुलावरून जाण्यासाठी या सोसायटीच्या समोरच रॅम्प उभारण्याचा घाट महापालिकेने घातलाय. त्यामुळे सोसायटीनं तीव्र निषेध केलाय. जवळपास १० हजार लोकवस्ती असलेली ही वसाहत शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. नागरिकांचा विरोध डावलून रँप बांधणारच असा हेका महापालिका प्रशासन मिरवत आहे. त्याला प्रचंड विरोध होतोय. 

तर रँप उभारण्याचा निर्णय नागरिकांना विचारूनच घेतलाय, रँप नागरिकांना त्रासदायक होणार नाही असा दावा आयुक्तांनी केलाय. उड्डाणपूल हा विकासाचं प्रतीक आहे यात शंकाच नाही. पण हा विकास साधताना नागरिकांच्या भावनांचा विचार व्हावा हीच काय ती अपेक्षा.