नाशिककर वाहनचालकांना दुप्पट भुर्दंड बसणार

नाशिककर वाहनचालकांना दुप्पट भुर्दंड बसणार आहे. महापालिकेच्या अनास्थेचा फटका नागरिकांना बसणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 8, 2018, 10:54 PM IST
नाशिककर वाहनचालकांना दुप्पट भुर्दंड बसणार title=

मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक : नाशिककर वाहनचालकांना दुप्पट भुर्दंड बसणार आहे. महापालिकेच्या अनास्थेचा फटका नागरिकांना बसणार आहे. शहरात पुरेशी पार्कींगची सोय नाही. तर वाहतूक पोलिसांनी मात्र नो पार्कींगमधली वाहनं उचलण्यासाठी नव्या कंत्राटदारासह नवं हायड्रोलिक वाहन आणलंय. मात्र त्यासाठी दंडाची रक्कम दुप्पट करण्यात आलीय.

नव्या टोईंग वाहनाचं प्रात्यक्षिक सुरू 

नाशिक पोलीस आयुक्त आणि इतर अधिका-यांसमोर नव्या टोईंग वाहनाचं प्रात्यक्षिक सुरू आहे. 8 जानेवारीपासून हे वाहनं रस्त्यावर उतरणार आहे. टोईंग कर्मचा-यांच्या उद्दामपणाच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यापासून सुटका म्हणून हे यंत्र.

वाहनावर सीसीटीव्हीही बसवण्यात आला

हायड्रोलिक वाहनाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार आहे. वाहनावर सीसीटीव्हीही बसवण्यात आलाय. त्यामुळे वाद टळतील अशी आशा आहे. 

अत्याधुनिक यंत्रणेचा फटका नागरिकांना

या अत्याधुनिक यंत्रणेचा फटका नागरिकांना बसणार आहे. शहरात वाहनं लावायला जागा नाही.. पोलीस मात्र वाहनं उचलून नेणार. तसंच नव्या यंत्रणेसाठी टोईंगचा दंड दुचाकीसाठी 170 वरून 300 रूपये तर चारचाकीसाठी थेट 650 रूपये वसूल केला जाणार आहे. 

केवळ दंड वाढवून समस्या सुटणार कशी

स्मार्ट सिटी स्पर्धेमुळे शहरात टोईंगसाठी अत्याधुनिक वाहनं आली खरी. पण वाहनं उचलण्याआधी शहरात पार्कींगची समस्या सोडवा. केवळ दंड वाढवून समस्या सुटणार कशी... यासाठी पोलिसांनी आधी मनपाशी समन्वय साधण्याची गरज आहे.