तुमची फसवणूक झाली नाही ना! नीरव मोदीने दागिन्यात असे गंडवले

तुम्ही हिऱ्यांचे दागिने घेतले असतील तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी. तुम्ही गितांजली डायमंडसमधून हिऱ्यांचे दागिने घेतले असतील, तर तुमची फसवणूक झालेय नक्की. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 21, 2018, 04:15 PM IST
तुमची फसवणूक झाली नाही ना! नीरव मोदीने दागिन्यात असे गंडवले

औरंगाबाद : तुम्ही हिऱ्यांचे दागिने घेतले असतील तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी. तुम्ही गितांजली डायमंडसमधून हिऱ्यांचे दागिने घेतले असतील, तर तुमची फसवणूक झालेय नक्की. 

मोदीच्या वेगवेगळ्या सुरसकथा

पंजाब नॅशनल बॅंकेला गंडा घातलेल्या नीरव मोदीच्या वेगवेगळ्या सुरसकथा रोज बाहेर येत आहे. हा नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी स्वतः हिऱ्यांचा व्यापार करायचे आणि ते हिरे खरे असल्याचं सर्टिफिकिट देण्यासाठीही त्यांनी स्वतःचीच एजन्सी उघडली होती. 

बनावट एजन्सीचे सर्टिफिकिट

मुळात अशी कुठली एजन्सी अस्तित्वातच नव्हती. ग्राहकही या बनावट एजन्सीच्या सर्टिफिकिटवर विश्वास ठेवून निर्धास्तपणे हिरे खरेदी करायचे. ग्राहकांनो लक्षात ठेवा, हिऱ्यांच्या अस्सलपणाचं प्रमाणपत्र देण्याचा अधिकार IGL आणि EGL या कंपन्यांना आहे. पण मोदी आणि चोक्सी या मामा भाच्याच्या जोडीनं अनेक ग्राहकांची अशा प्रकारे फसवणूक केलीय.

या दोघांच्या या बनावट प्रमाणपत्राच्या आधारावर ज्यांनी हिरे खरेदी केलीय, त्यांना हिरे विकायला गेल्यावर फक्त २० टक्केच परतावा मिळत होता.  

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close