राज्यातील खेळाडूंबाबत क्रीडा खात्याची उदासीनता

राज्यातील खेळाडूंबाबत क्रीडा खात्याची कशी उदासीनता आहे हेच आज नागपुरात पुन्हा एकदा दिसून आलं. 

Updated: Dec 10, 2017, 12:18 PM IST
राज्यातील खेळाडूंबाबत क्रीडा खात्याची उदासीनता title=

नागपूर : राज्यातील खेळाडूंबाबत क्रीडा खात्याची कशी उदासीनता आहे हेच आज नागपुरात पुन्हा एकदा दिसून आलं. 

मेक्सिको इथं पॅरा जागतिक जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्यावर नागपुरात दाखल झालेल्या कांचनमाला पांडेच्या स्वागताला क्रीडा खात्यातील एकही अधिकारी आणि कर्मचारी विमानतळावर उपस्थित नव्हता. याबाबत तिचे प्रशिक्षक प्रविण लामखेडे यांनी नाराजी व्यक्त केलीय. 

कांचनमाला पॅरा जागतिक जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी  पहिली भारतीय आहे. कांचनमालाने २०० मीटर वैयक्तिक मिडले प्रकारात ही सुवर्णमय कामगिरी केली. 

महत्त्वाचे म्हणजे क्रीडा मंत्री विनोद तावडेंनी कांचनमालाच्या कामगिरीबाबत ट्विटर आणि फेसबुकद्वारे अभिनंदन केलं आहे. त्यानंतर आज विमानतळावरही केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कांचनमालाचं अभिनंदन केलं. मात्र क्रीडा खात्याचा एकही अधिकारी वा कर्मचारी देशाचं नाव जागतिक स्तरावर उंचवणा-या कांचनमालाच्या स्वागतासाठी उपस्थित नसल्यानं क्रीडा जगतात संताप व्यक्त केला जात आहे.