नांदेडमध्ये कॉपी मुक्ती अभियानाचा फज्जा, समूह कॉपीचे प्रकार

जिल्ह्यात अनेक परीक्षा केंद्रांवर उघड कॉपी करण्याचे प्रकार सुरु असताना कॉपी मुक्ती अभियानाची जबाबदारी असणारे प्रशासन मात्र पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 28, 2018, 03:59 PM IST
नांदेडमध्ये कॉपी मुक्ती अभियानाचा फज्जा, समूह कॉपीचे प्रकार  title=

नांदेड : जिल्ह्यात अनेक परीक्षा केंद्रांवर उघड कॉपी करण्याचे प्रकार सुरु असताना कॉपी मुक्ती अभियानाची जबाबदारी असणारे प्रशासन मात्र पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

केंद्रावर कॉपी बहादरांची जत्रा 

नांदेड जिल्ह्यातील चिखली येथील परीक्षा केंद्रावर कॉपी बहादरांची जत्रा भरल्याची बातमी झी 24 तासने दाखवली होती. पण या प्रकाराची साधी माहिती सुद्धा जिल्हा परिषद अधिका-यांना नाही. सऱ्हासपणे कॉपीचा प्रकार घडला असतांना आतापर्यंत केवळ कॉपी प्रकरणी केवळ दोनवेळा कारवाया करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले.

समूह कॉपीचे प्रकार उघड

भरारी पथक, बैठे पथक, मोठी यंत्रणा लावली असुन कॉपी सुरु असल्याचे मुख्य अधिका-यांनी नाकारले. वस्तुस्थिती दाखवल्या मात्र कारवाई करण्याचे आश्वासन शिनगारे यांनी दिले. काही परीक्षा केंद्रावर खुलेपणाने समूह कॉपीचे प्रकार होत असतांना प्रशासन मात्र कागदावर कॉपी मुक्ती अभियान राबवत असल्याचे चित्र यावरुण दिसत आहे.