'त्या' ऑडियो क्लिपबद्दल मुख्यमंत्री म्हणाले...

संपूर्ण क्लिप मी स्वत: निवडणूक आयोगाला देणार असल्याचे' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले. 

Updated: May 26, 2018, 01:55 PM IST
'त्या' ऑडियो क्लिपबद्दल मुख्यमंत्री म्हणाले... title=

पालघर : 'शिवसेनेकडून ऑडियो क्लिप मोडून तोडून दाखवण्यात आली..शिवसेनेने ती क्लिप पूर्ण ऐकविली नाही.. संपूर्ण क्लिप मी स्वत: निवडणूक आयोगाला देणार असल्याचे' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले. यावेळी संपूर्ण ऑडियो क्लिप मुख्यमंत्र्यांनी ऐकवली.  पालघर लोकसभा पोटनिवडणूकसाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने राजकीय घडामोडींना वेग आलाय. सेनेच्या आरोपांना भाजप उत्तर देणार का? याकडे सर्वांच लक्ष होत. दरम्यान मुख्यमंत्र्यानी यावर भाष्य केलय.वसईच्या माणिकपूर भागात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला. ही शिवसेना नव्हे तर शिवविरोध सेना असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

विना संरक्षण फिरण्याची ताकद माझ्यात आहे. जास्त संरक्षण घेऊन फिरणाऱ्यांनी याचा विचार करावा असे म्हणत शिवसेनेवर प्रहार केलाय. तुम्ही जिल्ह्यापुरते मर्यादित आम्ही अखिल भारतीय पक्ष असल्याचेही ते म्हणाले. बाळासाहेबांचा पक्ष शिवसेना आणि आताचा शिवविरोध असल्याचेही त्यांनी सांगितले. 

महत्त्वाचे मुद्दे 

खंजीर खुपसणाऱ्यांना वनगांचा आत्मा माफ करणार नाही 

अनधिृत बांधकाम केलेले मजेत राहत आहेत. 

वनगा यांच्या मृत्यूच भांडवल शिवसेना करतेय 

सज्जन शक्ती दुर्जन शक्तींचा नाश करते 

सत्तेचे लटके तोडण्यासाठी सर्व एकत्र 

वसईच्या हरित पट्ट्या पू्र्ण संरक्षण देणार 

राजकारण कितीही करु द्या जनता आमच्यामागे आहे.