पंढरपूरच्या विठूरायाच्या चरणी ३७ लाखांचा सोन्याचा चंद्रहार अर्पण

पंढरपुरातल्या विठूरायाच्या चरणी  ३७ लाखांचा सोन्याचा चंद्रहार अर्पण केलाय. तब्बल ७३ तोळ्याचा हा हार असल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीनं दिलीय. 

Updated: Nov 23, 2018, 06:49 PM IST
पंढरपूरच्या विठूरायाच्या चरणी  ३७ लाखांचा सोन्याचा चंद्रहार अर्पण title=

सोलापूर : पंढरपुरातल्या विठूरायाच्या चरणी बंगळुरूतल्या विठ्ठलभक्तांना ३७ लाखांचा सोन्याचा चंद्रहार अर्पण केलाय. तब्बल ७३ तोळ्याचा हा हार असल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीनं दिलीय. बंगळुरूमधील विठ्ठलभक्त असलेले एन. जी. राघवेंद्र आणि बिपीन जलाणी यांनी हा चंद्रहार अर्पण केलाय. या चंद्रहारावर लक्ष्मीची सुंदर प्रतिमा आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं विठूरायाच्या गळ्यात हा हार घालण्यात आलाय. त्यामुळे चंद्रहार गळा कासे पितांबर असं मनमोहक विठ्ठलाचं रूप पाहण्याचा योग भाविकांना आला. 

तर दुसरीकडे त्रिपुरारी पौर्णिमा निमित्तानं विठ्ठल आणि रुख्मिणीचं मंदिर पुण्याचे भक्त राम जांभुळकर यांनी जर्बेराच्या फुलांनी सजवलीय. देवाचे हे रूप पाहण्यासाठी वारकऱ्यांनी मंदिरात मोठी गर्दी केली आहे. कार्तिकी यात्रेची आज सांगता आहे. आज देवाचे दर्शन घेऊन  आपल्या गावाकडची वाट धरतात. आज देवाचा निरोप घ्यायला आलेल्या वारकऱ्यांनी आकर्षक फुलांच्या सजावटीत विठुराया आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्याची व्यवस्था मंदिर समितीने केली आहे.