पालकानो सावधान, लहान मुलींना असं केलं जातेय टार्गेट

 सगळ्या पालकांनी आणि ठाणेकरांनी या बातमीकडे नक्की लक्ष द्या.  

Updated: Aug 8, 2018, 04:20 PM IST
पालकानो सावधान, लहान मुलींना असं केलं जातेय टार्गेट title=

ठाणे : एक धक्कादायक बातमी ठाण्यातून, सगळ्या पालकांनी आणि ठाणेकरांनी या बातमीकडे नक्की लक्ष द्या. ठाण्यात एक तरुण लहान मुलींना काहीतरी टोचत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसतंय. ठाण्यातल्या पाचपाखाडी भागातली ही दृश्यं आहेत. हा तरुण येतो आणि लहान मुलींना काहीतरी टोचतो, असं स्पष्ट दिसतंय. ( या बातमीचा व्हिडीओ खाली पाहा )

हा तरुण दिसला तर ताबडतोब नौपाडा पोलिसांशी संपर्क करा, असं आवाहन पोलिसांनी केलंय. हा माणूस नेमकं काय टोचतो, हे समोर आलेलं नाही. या माणसाचा शोध सुरू आहे, पालकांनीही हा माणूस दिसला तरी 022-25444433 या क्रमांकावर संपर्क साधावा. 

लहान मुलींना सुई सारखं हा इसम काहीतरी टोचतो...

विशेष म्हणजे हा माणूस असं का करतो, हे अजून समजू शकलेलं नाही. काहींना तो मनोरूग्ण वाटतोय, लहान मुलींना तो सुई सारखं असं काही टोचतो की, व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे, लहान मुलींना फार मोठ्या प्रमाणात इजा होते.

या व्हिडीओत आणखी एक प्रकार दिसून येतो की, आपल्या मुलीला या अनोळखी व्यक्तीकडून काही तरी वस्तू टोचून त्रास दिला जातो. तरी देखील एक महिला या व्यक्तीला तसं विचारायला, तयार नाही, किंवा आजूबाजूच्या लोकांनी याकडे कोणतंही लक्ष दिलेलं नाही.