पिंपरी चिंचवडचे रस्ते हिरॉईनच्या गालासारखे... म्हणजे नेमके कसे?

एखाद्या शहरात तुम्ही तुमच्या टू व्हीलर किंवा फोर व्हिलरवर फेरफटका मारला, तर एखादा तरी धक्का तुम्हाला खड्ड्यामुळे बसतोच... पण पिंपरी चिंचवडचे रस्ते एखाद्या हिरोईनच्या गालासारखे गूळगुळीत आहेत आसा दावा मनपाने केलाय. 

Updated: Dec 7, 2017, 09:21 PM IST
पिंपरी चिंचवडचे रस्ते हिरॉईनच्या गालासारखे... म्हणजे नेमके कसे?

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : एखाद्या शहरात तुम्ही तुमच्या टू व्हीलर किंवा फोर व्हिलरवर फेरफटका मारला, तर एखादा तरी धक्का तुम्हाला खड्ड्यामुळे बसतोच... पण पिंपरी चिंचवडचे रस्ते एखाद्या हिरोईनच्या गालासारखे गूळगुळीत आहेत आसा दावा मनपाने केलाय. 

पिंपरी चिंचवडच्या रस्त्यांबाबत मनपाचं हे भन्नाट उत्तर... रस्त्यांवर किती खड्डे आणि कितींची दुरूस्ती झाली या प्रश्नावर मनपाने हे उत्तर दिलं. मात्र मनपाला हिरॉईनच्या गालावरसारखे दिसणारे रस्ते खरंच तसे आहेत का... वस्तूस्थिती पाहा... चिंचवड गाव, लिंक रोड, डांगे चौक आणि चाफेकर चौकात असलेले हे खड्डे महापालिकेचा खोटारडेपणा दाखवत आहेत.

मात्र, टीकेला सुरूवात झाल्यावर प्रशासनाने वेळ मारून नेली. जिथून तक्रारी आल्या तिथले रस्ते गुळगुळीत केले असं आता मनपा म्हणतेय. 

आता नागरिकांना रस्ते दिसतायत पण मनपाला दिसत नाहीत असं म्हणायचं की हिरॉईनचे गालच खडबडीत असतात असा मनपाचा दावा आहे देव जाणे...