गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढली

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे कोकणात येणा-या चाकरमान्याची संख्याही वाढली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक सध्या सुरळीत आहे.

Updated: Aug 23, 2017, 11:01 AM IST
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढली title=

रत्नागिरी : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे कोकणात येणा-या चाकरमान्याची संख्याही वाढली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक सध्या सुरळीत आहे.

विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर रेल्वे वाहतुकीवरही कोणताही परिणाम झालेला नाही. महामार्गावर काही ठिकाणी खड्डे असल्यामुळे चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागतोय. रायगडमध्ये वडखळ नाक्यावर वाहतूक कोंडीचा सामना चाकरमन्याना करावा लागतोय. मात्र, रत्नागिरीत वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी विशेष खबरदारी प्रशासनानं घेतली आहे. 

कोकणातल्या देवरुख येथील पहिल्या मानाच्या गणपतीचं आगमन झालं आहे. संगमेश्वर तालुक्यातील देवरुख मधल्या चौसुपी वाड्यातील जोशी यांचा हा गणपती ३७० वर्षांपासून पारंपरिक वाद्याच्या साथीने आणला जातो. घोड्यावर आरुढ झालेली दिमाखदार मूर्ती डोक्यावरुन घेवून ही मिरवणूक निघते.

पाहा व्हिडिओ