चंद्रपूरमध्ये पेट्रोलपंपावर पेट्रोल चोरीचा भांडाफोड

वरोरा शहरात ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिका-यांनी एका पेट्रोल पंपावर छापा मारुन, पेट्रोल चोरीचा भांडाफोड केला. नागपूर-चंद्रपूर महामार्गावरच्या पद्मालया पेट्रोलियम पंपावर हा छापा टाकण्यात आला. या छाप्यात तब्बल २२ पैकी १८ नोजल्समध्ये गडबड असल्याचं उघड झालं.

Updated: Jul 3, 2017, 02:00 PM IST
चंद्रपूरमध्ये पेट्रोलपंपावर पेट्रोल चोरीचा भांडाफोड title=

चंद्रपूर : वरोरा शहरात ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिका-यांनी एका पेट्रोल पंपावर छापा मारुन, पेट्रोल चोरीचा भांडाफोड केला. नागपूर-चंद्रपूर महामार्गावरच्या पद्मालया पेट्रोलियम पंपावर हा छापा टाकण्यात आला. या छाप्यात तब्बल २२ पैकी १८ नोजल्समध्ये गडबड असल्याचं उघड झालं.

हे १८ नोजल्स सील करण्यात आले असून, त्यांचं पल्सर कार्ड, मदर बोर्ड, कंट्रोल कार्ड आणि इतर साहित्यही जप्त केलं गेलंय. या पेट्रोल पंपावरच्या चिपमध्ये फेरफार करून प्रति ५ लीटर पेट्रोल मागे ४० ते ७० मिलिलीटर पेट्रोल कमी भरलं जात होतं.