ऐकावं ते नवलच! पिंपरी-चिंचवडमध्ये आढळली ४ पायांची कोंबडी

निगडीतल्या तन्वीर चिकन शॉप मध्ये नेहमीप्रमाणे शंभर-सव्वाशे कोंबड्या आल्या.

Updated: Sep 10, 2018, 10:53 PM IST
ऐकावं ते नवलच! पिंपरी-चिंचवडमध्ये आढळली ४ पायांची कोंबडी

कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड : निगडीतल्या तन्वीर चिकन शॉप मध्ये नेहमीप्रमाणे शंभर-सव्वाशे कोंबड्या आल्या. एकामागून एक कोंबड्या हलाल होऊ लागल्या. तेवढ्यात कुदबुद्दीनच्या मुलानं कुदबुद्दीन यांना कोंबडीला चार पाय असल्याचं सांगितलं. कुदबुद्दीन त्यांच्या मुलावर चिडले आणि चेष्टा सोड, कामाकडे लक्ष दे सांगितलं. शेवटी त्याच्या मुलाने ती कोंबडी बाहेर आणून दाखवली. (बातमीचा व्हिडिओ पाहा सर्वात खाली)

पंचवीस वर्षाच्या व्यवसायात पहिल्यांदाच अशी चार पायाची कोंबडी कुतुबुद्दीननं पाहिली होती. ही चार पायांची कोंबडी वाऱ्यासारखी पसरली आणि कुतुबुद्दीनच्या दुकानात एकच गर्दी झाली.

आता या कोंबडीला सध्या विशेष सेवा मिळतेय. म्हणूनच सकाळी पिंजऱ्यात ठेवलेल्या सगळ्या कोंबड्या हलाल झाल्या. पण चार पाय असल्यानं ही कोंबडी वाचली. आता कुतुबुद्दीन म्हणे तिची आजन्म सेवा करणार आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close