गोकुळने प्रत्येक टँकरसाठी घेतला पोलीस बंदोबस्त

शेतकरी संपाची कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळने गंभीर दखल घेतली आहे. सांगली आणि सातारामध्ये शेतकऱ्यांनी दुधाचे टँकर फोडल्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक टँकरसाठी पोलीस बंदोबस्त घेतला आहे.

Updated: Jun 1, 2017, 04:40 PM IST
गोकुळने प्रत्येक टँकरसाठी घेतला पोलीस बंदोबस्त title=

कोल्हापूर : शेतकरी संपाची कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळने गंभीर दखल घेतली आहे. सांगली आणि सातारामध्ये शेतकऱ्यांनी दुधाचे टँकर फोडल्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक टँकरसाठी पोलीस बंदोबस्त घेतला आहे.

संप पुकारलेल्या राज्यातल्या शेतक-यांच्या संपाचा उद्रेक झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे शेतक-यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. गुजरातकडे दुध घेऊन जाणारा टँकर अडवून दुध रस्त्यावर सोडून दिलं. यामुळे हजारो लीटर दुध वाया गेलं आहे. तर नगरमधल्याच पारनेर तालुक्यातील निघोज येथील शेतकरी रस्त्यावर उतरले. गोरेगाव येथून दुध घेऊन जाणारा दुधाचा टँकर अडवून दुध रस्त्यावर ओतून दिलं आहे. धुळ्यातही शेतक-यांनी दूध रस्त्यावर फेकून दिलं आहे. सरकारने शेतक-यांना मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.