प्रसाद लाड यांच्या विजयाची औपचारिक घोषणा बाकी

 ७ पर्यंत भाजपाचे उमेदवार प्रसाद लाड यांच्या विजयाची औपचारिक घोषणा होणे अपेक्षित आहे. 

Updated: Dec 7, 2017, 01:54 PM IST
 प्रसाद लाड यांच्या विजयाची औपचारिक घोषणा बाकी

मुंबई : विधानपरिषदच्या एका जागेच्या निवडणुकीच्या मतदानाला  ९ वाजता विधीमंडळमध्ये सुरुवात झाली आहे. 

विधानसभा सदस्यांचे मतदान

 पहिला मतदानाचा हक्क प्रणिती शिंदे हिने बजावला असून मुख्यमंत्री , सुधीर मुंगनटीवर, आशिष शेलार, विखे पाटील, चंद्रकात पाटील, जयंत पाटील, अजित पवार आणि विविध आमदार अशा सुमारे ७५ पेक्षा जास्त विधानसभा सदस्यांनी मतदान केले आहे. 

औपचारिकता बाकी 

संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. साधारण ५ नंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. ७ पर्यंत भाजपाचे उमेदवार प्रसाद लाड यांच्या विजयाची औपचारिक घोषणा होणे अपेक्षित आहे.