...आणि त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले

कळंबा कारागृहात एक अनोखा सोहळा पार पडला. कारागृहाच्या इतिहासात दुसऱ्यांदा हा सोहळा पार पडला असून यामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांचा आणि त्यांच्या चिमुकल्यांची गळाभेट घडवून आणली. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 27, 2017, 11:10 PM IST
...आणि त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले title=

कोल्हापूर : कळंबा कारागृहात एक अनोखा सोहळा पार पडला. कारागृहाच्या इतिहासात दुसऱ्यांदा हा सोहळा पार पडला असून यामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांचा आणि त्यांच्या चिमुकल्यांची गळाभेट घडवून आणली. 

या संपूर्ण वातावरणामुळं सोहळ्याला उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आलं.या सोहळ्यात अनेक कैदी आपल्या लाडक्या मुलांचं पापा घेऊन पोटाशी कवटाळंत होते. 

कळंबा कारागृहातील हे चित्र कैद्यांसाठीच नाही तर उपस्थितांच्याही डोळ्यात पाणी आणणारं होते. ज्या चार भिंती आड आयुष्य काढण्याची वेळ ज्यांच्यावर आली त्याच्यासोबत कारागृहाच्या भिंतींनाही गहिवरुन आले असेल.