नागपूर : खासगी बस - टिप्पर भीषण अपघात, पाच ठार

ट्रॅव्हल्स बस आणि टिप्परची समोरासमोर धडक झाली. या धडकेत ट्रॅव्हल बसमधील 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

Updated: Oct 9, 2018, 11:05 PM IST
नागपूर : खासगी बस - टिप्पर भीषण अपघात, पाच ठार title=

नागपूर : उमरेड मार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि टिप्परची समोरासमोर धडक झाली. या धडकेत ट्रॅव्हल बसमधील 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 10 जण जखमी झालेत. उभ्या असलेल्या टिप्परला ट्रॅव्हल्स बसने जोदरात धडक दिली. हा अपघात उदासा शिवार  येथे घडला. हा अपघात आज रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत.