मुंबई-पुणे मार्गावरची रेल्वे वाहतूक ठप्प

खंडाळा घाटमार्गावर रेल्वेची मालगाडी घसरल्यामुळे मुंबई-पुणे मार्गावरची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. 

Updated: Sep 7, 2017, 10:36 PM IST
मुंबई-पुणे मार्गावरची रेल्वे वाहतूक ठप्प title=

खंडाळा : खंडाळा घाटमार्गावर रेल्वेची मालगाडी घसरल्यामुळे मुंबई-पुणे मार्गावरची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. 

त्यामुळे रेल्वेकडून दुपारनंतर सुटणाऱ्या अनेक मेल एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे, कोल्हापूरकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या सोईसाठी, एसटीने छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन, दादर, कल्याण व कर्जत येथून जादा बसेस सोडल्या आहेत.