अभिमानास्पद : मराठमोळ्या महेश भागवतांचा जागतिक पातळीवर सन्मान

महाराष्ट्राला मान उंचावणारी गोष्ट 

अभिमानास्पद : मराठमोळ्या महेश भागवतांचा जागतिक पातळीवर सन्मान

मुंबई : राचाकोंडा पोलीस आयुक्त महेश भागवत यांच्या कामाची आता जगभरात चर्चा होत आहे. मानवी तस्करी रोखण्याबाबतच्या कामाची आता जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. जगातील अवैध मानवी वाहतुकीला आळा घालणाख्या जगभरातील 100 प्रभावी व्यक्तींमध्ये मराठमोळ्या भागवत यांची गणना झाली आहे. यामुळे महाराष्ट्राला अभिमानास्पद या गोष्टीची सगळीकडे चर्चा आहे. अमेरिकेतील असेंट कम्प्लायन्स या संस्थेच्यावतीने त्यांची निवड करण्यात अाली अाहे. या अाधी सुद्धा भागवत यांना अमेरीका सरकारचा ट्रॅफिकिंग इन पर्सन रिपाेर्ट हिराे हा पुरस्कारही त्यांना मिळाला अाहे. 2004 पासून भागवत हे मानवी तस्करी राेखण्याचे काम करत असून त्यांनी भारतातील विविध शहरांमध्ये अात्तापर्यंत हे कार्य केले अाहे. 

या संदर्भात भागवत सांगतात की, मानवी तस्करीवर कारवाई करणे ही सोपी बाब नाही. 2004 पासून मी हे काम सुरूवातीला हैदराबादपासून सुरू केलं. आणि मग ते आंध्र प्रदेशच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पसरलं. त्यांनी गुन्हे अन्वेशन विभागाच्या महिला सेल्ससोबतही काम केले. संयुक्त राष्ट्र आणि गृहमंत्रालयाच्या सहकार्याने त्यांना भारतातील बंगळुरू, दिल्ली, मुंबई, पुणे या शहरांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. जगभरातील १०० प्रभावी व्यक्तींध्ये पोलीस आयुक्त महेश भागवत यांना ४७ वा क्रमांक मिळाला आहे.

अवैध मानवी वाहतूक राेखणे म्हणजे केवळ महिलांची साेडवणूक नाही तर त्यांचे सुरक्षित जागी पुर्नवसन करणे तितकेच महत्त्वाचे असते असे भागवतांचे म्हणणे अाहे. पाेलीसांचे काम हे त्या व्यक्तीला साेडवूण अाणणे असते. सरकारने त्या व्यक्तीला संरक्षण देणे गरजेचे असते. त्याचबराेबर साेडवणूक करुन अाणलेल्या महिलेने पुन्हा त्या मार्गाकडेवळू नये यासाठी त्यांचे याेग्य पुर्नवसनही तितकेच महत्त्वाचे अाहे असे भागवतांना वाटते. साेडवणूक केलेल्या महिलेला अार्थिक मदत मिळेल याकडेही ते लक्ष देत असतात. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close