पुण्यात डंपरच्या धडकेने तरूणीचा मृत्यू

 बीपीओमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा डंपरच्या धडकेत मृत्यू झालाय.

Updated: Jul 28, 2017, 07:41 PM IST
पुण्यात डंपरच्या धडकेने तरूणीचा मृत्यू title=

पुणे : पुण्याच्या चांदणी चौकातील वाहतूक समस्येनं आज आणखी एक बळी घेतलाय. बीपीओमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा डंपरच्या धडकेत मृत्यू झालाय. पूजा चव्हाण असं अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणीचं नाव आहे. 

तिच्यासोबत असलेली शीतल राठोड ही महीलादेखील या अपघातात गंभीर जखमी झालीय.तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. पुण्यातील एका डॉकटर महिलेचा टॅंकरच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज आणखी एक अपघात झाला आहे.