पुण्यातील बिल्डरची हत्या खंडणी किंवा जागेच्या वादातून

पुण्यात अज्ञातांकडून बांधकाम व्यावसायीक देवेंन शहा यांची हत्या करण्यात आलीये. प्रभात रस्त्यावर काल रात्री अज्ञातांकडून  त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

Updated: Jan 14, 2018, 02:08 PM IST
पुण्यातील बिल्डरची हत्या खंडणी किंवा जागेच्या वादातून

पुणे : पुण्यात अज्ञातांकडून बांधकाम व्यावसायीक देवेंन शहा यांची हत्या करण्यात आलीये. प्रभात रस्त्यावर काल रात्री अज्ञातांकडून  त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

खंडणी किंवा जागेच्या वादातून ही हत्या झाल्याचं बोललं जातंय.

डेक्कन पोलिसांनी या प्रकरणी रात्री उशिरा दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे. देवेंन्द्रभाई शहा हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहे.

अंबिका ग्रुप ऑफ रिअल इस्टेट नावाने त्यांचा व्यवसाय आहे. काल रात्री अकराच्या सुमारास शहा हे त्यांच्या प्रभात रोडवरील गल्ली नंबर ७ सायली अपार्टमेंट येथील राहत्या घरी होते.

शिविगाळ 

 यावेळी दुचाकीवरील आलेल्या दोन अनोळखी इसमांनी अपार्टमेंटमधील खाली असलेल्या इस्त्री दुकानदाराला शिविगाळ करून शहा यांना खाली बोलवून आणण्यास सांगितले.

त्यावेळी त्यांनी हा प्रकार शहा यांना सांगितला. हे ऐकून शहा आणि त्यांचा मुलगा दोन्हीही लिफ्टमधून खाली आले. 

५ गोळ्या झाडल्या 

 शहा बाहेर येताच दोन्ही आरोपींनी लागोपाठ ५ गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी शहा यांच्या कमरेत आणि दुसरी छातीत लागली.

गोळीबार करून दोघेही दुचाकीवरून फरार झाले. या हल्ल्यात जखमी झालेल्या शहा यांना तातडीने पुना हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.