Pune Porsche Accident : विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न, पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरातील घटना

पुणे अपघात प्रकरणात विशाल अग्रवालला कोर्टात दाखल केले जात असताना हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. 

Updated: May 22, 2024, 03:09 PM IST
Pune Porsche Accident : विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न, पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरातील घटना title=

Pune Porsche Car Accident : पुणे अपघात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात येत आहेत. कल्याणी नगर परिसरात पोर्शे कार चालवत असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने एका दुचाकीला धडक दिली होती. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. आता प्रकरणामुळं महाराष्ट्रात मोठा गदारोळ माजला आहे. याप्रकरणी वंदे मातरम संघटनेकडून विशाल अग्रवालवर शाईफेक करण्यात आली. 

वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक

पुण्यातील  हिट अँड रन प्रकरणानंतर आता वंदे मातरम संघटनेकडून विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरात ही घटना घडली. वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केली आहे. विशाल अग्रवालला कोर्टात दाखल केले जात असताना हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. 

 4.30 वाजता जाहीर होणार अंतिम निर्णय

याप्रकरणी पुणे हिट अँड रन प्रकरणी आज 4.30 वाजता अंतिम निर्णय जाहीर होणार आहे. सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाकडून कोर्टात बाजू मांडण्यात आली. न्यायदंडाधिकारी एम. पी परदेशी यांच्यासमोर ही बाजू मांडण्यात आली. या दोन्हीही पक्षांचा युक्तिवाद संपल्यानंतर आज 4.30 वाजता अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे. चार वाजेपर्यंत निर्णय राखून ठेवण्यात आला आहे.  

पुणे महापालिकेचा हातोडा

पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातानंतर पुणे महापालिकेने आक्रमक पावित्रा घेतला. याप्रकरणी कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या वॉर्टस आणि ओरिल्ला पबवर महापालिकेकडून पाडकाम करण्यात आले. पुण्यातील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या कोरेगाव पार्कमध्ये अनेक पबचे बांधकाम हे बेकायदेशीरपणे करण्यात आले होते. वॉटर्स आणि ओरेला असे या पबचे नाव होते. या पबमध्ये बसून आरोपी अनेकदा मद्यप्राशन करायचा असा आरोप केला जात आहे. या बेकायदेशीर बांधकामावर आता पुणे महापालिकेचा हातोडा पडला आहे. कोरेगाव परिसरातील बेकायदेशीर पबवर ही कारवाई करण्यात आली आहे. बुलडोझर आणि जेसीबीच्या मदतीने पबचे बांधकाम पाडण्यात येत आहे. 

पुणे अपघात प्रकरणात आज काय होणार ?

दरम्यान पुणे अपघात प्रकरणी चालक मुलाचे वडील विशाल अग्रवालला आज सकाळी 11 वाजता न्यायालयात हजर केलं जाणार आहे. यावेळी पोलिसांकडून कोठडीची मागणी केली जाऊ शकते. दुसरीकडे चालक अल्पवयीन असल्याने त्याला सज्ञान ठरवण्यासाठी बाल न्याय हक्क मंडळाकडे पुणे पोलिसांकडून करण्यात आलेल्या अर्जावर निर्णय अपेक्षित आहे. 

तसंच चालक मुलाचा वैद्यकीय तपासणीचा अहवाल अपेक्षित असून त्यातून त्याने मद्यप्राशन केले होते का? याबाबतचा अधिकृत खुलासा होणार आहे. याशिवाय घटनेसाठी कारणीभूत इतर खासगी तसंच सरकारी व्यक्तींवर बेजबाबदारपणा दाखवल्याबद्दल कारवाई अपेक्षित आहे.