चोराने पैशांवर डल्ला मारला, मात्र महिलेच्या हुशारीने अटक

 रक्षाबंधनासाठी आलेल्या सारिका सोनावणेंचं जबरदस्त धाडस, बसमध्ये पैसे चोरणाऱ्या महिला टोळीला केले पोलिसांच्या हवाली.

Updated: Aug 28, 2018, 09:46 PM IST
चोराने पैशांवर डल्ला मारला, मात्र महिलेच्या हुशारीने अटक

पुणे : बातमी एका धाडसी महिलेची. ती रक्षाबंधनासाठी मुंबईहून पुण्याला गेली. बसमध्ये तिचे पैसे चोरले. पण या महिलेनं अतिशय हुशारीनं हे पैसे मिळवले आणि चोरट्यांनाही पोलिसांच्या हवाली केलं. सारिका सोनावणे. लोकांच्या कौतुकाचा विषय ठरल्या आहेत. कारण त्यांनी कामगीरीही तशीच केलीय. राखी पौर्णिमेसाठी सोमवारी सोनावणे मुंबईवरुन पुण्यात आल्या. पुण्यात त्यांना नगर रस्त्यावरच्या रामवाडीमध्ये जायचं होत. त्यासाठी त्या येरवड्यातल्या पीएमपीएलच्या बस स्टॉपवर आल्या. 

बस मध्ये बसण्यासाठी सोनावणे यांनी ज्या महिलेला जागा दिली, तिच्याबरोबर आणखी दोन महिला होत्या. या तिघींनी पद्धतशीरपणे सोनावणे यांच्याभोवती कडं केलं. आणि कोणाला काही कळायच्या आत शिताफीनं त्यांच्या पर्समधले पैसे चोरले.  

येरवडा पोलीस ठाण्यात गेल्यावर या महिलांनी गुन्हा कबुल केला. पैसे ही परत दिले.  याच बसमधल्या आणखी एका महिलेचं मंगळसूत्रही या तीन महिलांनी चोरलं होतं. चोरी करणाऱ्या या महिला आंध्र प्रदेशच्या आहेत. सारीका सोनावणे यांनी दाखवलेली समयसूचकता आणि धाडस यामुळं त्यांना त्यांचे पैसे तर परत मिळालेत. पण त्याचबरोबर महीला चोरांची ही टोळीही गजाआड झाली.